महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सरकार हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गृहमंत्री देशमुख यांची ग्वाही - अनिल देशमुख न्यूज

गृहमंत्री देशमुख यांनी प्राणहिता पोलीस मुख्यालयात पोहोचताच त्यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. यासोबतच त्यांनी या चकमकीत प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या धाडसी पोलीस जवानांशी थेट संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह त्यांनी हुतात्मा जवान किशोर आत्राम यांची पत्नी-माता व बहीण यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

maharashtra home minister anil deshmukh visited gadchiroli
राज्य सरकार हुतात्मा जवानांच्या कुटूंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गृहमंत्री देशमुख यांची ग्वाही

By

Published : Jun 7, 2020, 11:50 AM IST

गडचिरोली - मागील महिन्यात भामरागड तालुक्यात पुयारकोटी-कोपरशी जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना दोन जवानांना वीरमरण आले होते. हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली. राज्य सरकार हुतात्मा जवानाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. वीरमरण आलेल्या पोलीस जवानाच्या पत्नीला मिळणारी मदत विभागून मातापित्यांनाही मिळावी, या प्रस्तावावर विचार होणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी गृहमंत्र्यांनी प्राणहिता पोलीस मुख्यालयात शहीद स्मृतिसमृद्धी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.

अनिल देशमुख गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात बोलताना...

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात भेट दिली. मागील महिन्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत वीरमरण आलेल्या पोलीस जवानाच्या कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधला. 17 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यात असलेल्या पुयारकोटी-कोपरशी जंगल परिसरात सकाळी नक्षलविरोधी अभियान राबविले जात असताना पोलीस-नक्षल यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांनी केलेल्या कटाचा गडचिरोली पोलीस दलाच्या जलद प्रतिसाद पथकाने धाडसी मुकाबला केला. यात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने व पोलीस शिपाई किशोर आत्राम यांना वीरमरण आले होते.

गृहमंत्री देशमुख यांनी प्राणहिता पोलीस मुख्यालयात पोहोचताच त्यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. यासोबतच त्यांनी या चकमकीत प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या धाडसी पोलीस जवानांशी थेट संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह त्यांनी हुतात्मा जवान किशोर आत्राम यांची पत्नी-माता व बहीण यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

राज्य शासन वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वीरमरण आलेल्या जवानांना मिळणारी मदतीची रक्कम विभागून मातापित्यांना ही मिळावी, असा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य शासन यावर सकारात्मक विचार करणार असल्याचे, गृहमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा -फळांमध्ये बॉम्ब लपवून घेतात वन्यप्राण्यांचा जीव, गडचिरोलीत अतिशय क्रुरपद्धतीने होते शिकार

हेही वाचा -समाधानकारक! गडचिरोलीत आणखी ६ जण कोरोनामुक्त


ABOUT THE AUTHOR

...view details