महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याचा विद्युत झटक्याने मृत्यू - ekalpur

शिकारीसाठी निघालेल्या बिबट्याने आंब्याच्या झाडावर बसलेल्या वानरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वानराने झाडालगत असलेल्या विद्युत तारेवर उडी मारली. त्यापाठोपाठ बिबट्यानेही उडी मारल्याने झटापटीत दोघाचाही विद्युत तारेला स्पर्श होऊ मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मृत बिबट आणि वानराचे छायाचित्र

By

Published : Jul 29, 2019, 2:06 PM IST

गडचिरोली- वानराच्या शिकारी दरम्यान झालेल्या झाटापटीत विद्युत तारेला स्पर्श लागल्याने बिबट आणि वानर या दोघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना २८ जुलैच्या रात्री देसाईगंज तालुक्यातील एकलपूर जवळील एका शेतात घडली.

शिकारीसाठी निघालेल्या बिबट्याने आंब्याच्या झाडावर बसलेल्या वानरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वानराने झाडालगत असलेल्या विद्युत तारेवर उडी मारली. त्यापाठोपाठ बिबट्यानेही उडी मारल्याने झटापटीत दोघाचाही विद्युत तारेला स्पर्श होऊ मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे अधिकारी डी.एफ.ओ. भिवरेकर, सहाय्यक वन संरक्षक कांबळे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बिबट व वानराचा मृतदेह वडसा वनविभागामध्ये आणण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details