गडचिरोली- जिल्ह्यातील कुरखेडा पोलिसांनी अवैधपणे मोहफूलाची दारू हातभट्टीवर बनवऱ्यांविरोधात शनिवारी धडक मोहीम राबवली. पोलिसांनी वाकडी येथे ७ ठिकाणी तर मोहगाव येथे एका ठिकाणी छापा टाकत दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या. घटनास्थळावरून १४५ लिटर दारू व १२० लिटर सडवा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी १४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
कुरखेडा पोलिसांचा ८ दारू अड्ड्यांवर छापा; १४ जणांवर गुन्हे दाखल - 8 हातभट्टी अड्डे उद्धवस्त
कुरखेडा पोलिसांनी वाकडी येथे 7 आणि मोहगाव येथे एका हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 145 दारु आणि 120 लिटर सडावा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 14 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी व मोहगाव परीसरातूनच कुरखेडा शहरात दारूचा पुरवठा होत आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी एकाच वेळी वाकडी येथे गावालगत सूरू असलेल्या हातभट्टीवर धडक देत आरोपी बैधराम देशमुख, रोहित देशमुख व अर्चना देशमुख यांचा विरोधात गुन्हा दाखल केला. याठिकाणाहून १० लिटर दारु व २० लिटर सडवा असा ५ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला. येथीलच ओमप्रकाश गायकवाड व मनिषा गायकवाड यांच्याकडूनही १५ लिटर दारु व २० लिटर सडवा असा ८ हजार ७०० रुपयांचा माल जप्त केला. तसेच सुलोचणा राऊत, दिपक राऊत, मोहन उईके, उमेश उईके, गणेश गायकवाड यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली.
मोहगाव येथे छापा मारून येथील सदानंद नैताम, नितीन नैताम, वर्षा नैताम यांचा भट्टीतून ३० लिटर दारू जप्त करीत सर्व आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सूधाकर देडे, साहायक पोलीस निरीक्षक समीर केदार, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरूण पारधी, हवालदार उमेश नेवारे, कैलाश रामटेके, नितीन नैताम आणि वाकडी येथील दारुबंदी समिती सदस्य किसन उईके व चंद्रलेखा मेश्राम यांनी केली.