गडचिरोली- 28 ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताह पाळण्यात येत आहे. या पाश्वभूमीवर जिल्ह्यातील दुर्गम भागात नक्षलवाद्यांनी कापडी बॅनर व पत्रक लावले होते. मात्र याविरोधात एटापल्ली तालुक्यातील ताडगुडा, कसुरवाही भागात नागरिकांनी विरोध दर्शवत नक्षली बॅनरची होळी केली. तसेच नक्षलवादी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह : गडचिरोलीत गावकऱ्यांकडून नक्षली बॅनरची होळी - police
माओवादी नेता चारू मजुमदार, पेद्दी शंकर आझादसह चकमकीत ठार झालेल्या माओवादी नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नक्षलवादी दरवर्षी शहीद सप्ताह साजरा करतात.
नक्षलग्रस्त गडचिरोलीसह दंडकारण्यात २८ जुलै ते ३ ऑगस्ट नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताह पाळण्यात येत आहे. यापूर्वीच दुर्गम भागात पत्रके टाकून 'नक्षल अमर शहीद सप्ताह' साजरा करण्याचे आवाहन नक्षल्यानी केले होते. माओवादी नेता चारू मजुमदार, पेद्दी शंकर आझादसह चकमकीत ठार झालेल्या माओवादी नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नक्षलवादी दरवर्षी शहीद सप्ताह साजरा करतात.
शहीद सप्ताहात मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडविण्याचा प्रयत्नात नक्षलवादी असतात. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील पोलीस ठाणे आणि उपपोलीस ठाण्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस, सी-६० पथक, सीआरपीएफ या सुरक्षा दलाकडून दुर्गम नक्षलग्रस्त भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.