महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एटापल्लीत माजी आमदाराचे ४ दिवसांपासून उपोषण, शहरात बंद पाळून प्रशासनाचा निषेध

एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली येथे १६ जानेवारीला लॉयड मेटल्स कंपनीच्या खनिज वाहतूक ट्रकने एस. टी. बसला धडक दिली होती. गुरुपल्ली गावाजवळ झालेल्या या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. सुमारे १० हजार लोकांनी या घटनेनंतर या मार्गावर धावणाऱ्या लॉयड मेटल्स कंपनीच्या ट्रकसह सुमारे १० ते १५ ट्रकची जाळपोळ केली होती. त्यावेळी पोलीस, पालकमंत्री अंबरीश आत्राम यांनी कंपनी आणि ग्रामस्थ यांच्यात समेट घडवून आणत वातावरण शांत केले होते.

उपोषण

By

Published : Mar 9, 2019, 8:38 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील सूरजागड डोंगरावर (पहाडी) उत्खनन करणाऱ्या 'लॉयड मेटल्स' कंपनीने अपघातातील जखमींची दिशाभूल केली आहे. त्यांना दिलेली नुकसान भरपाईची हमी पूर्ण केली नसल्याचा आरोप माजी आमदार दीपक आत्राम यांनी केला आहे. त्यामुळे कंपनीविरोधात दीपक आत्राम यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ६ मार्चपासून उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी एटापल्ली येथे कडकडीत बंद ठेवून थेट मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

उपोषण

एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली येथे १६ जानेवारीला लॉयड मेटल्स कंपनीच्या खनिज वाहतूक ट्रकने एस. टी. बसला धडक दिली होती. गुरुपल्ली गावाजवळ झालेल्या या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. सुमारे १० हजार लोकांनी या घटनेनंतर या मार्गावर धावणाऱ्या लॉयड मेटल्स कंपनीच्या ट्रकसह सुमारे १० ते १५ ट्रकची जाळपोळ केली होती. त्यावेळी पोलीस, पालकमंत्री अंबरीश आत्राम यांनी कंपनी आणि ग्रामस्थ यांच्यात समेट घडवून आणत वातावरण शांत केले होते.

प्रकरण मिटवताना कंपनीने पीडित कुटुंबाला २५ लाख नुकसान भरपाई, सदस्याला नोकरी, नोकरी मिळेपर्यंत मानधन, जाळपोळ झालेल्या ट्रकची नुकसानभरपाई, गुन्हे मागे घेण्याची कारवाई, असे अनेक विषय रेटले होते. मात्र, यातील ९० टक्के मुद्दे पूर्ण झालेले नाहीत. कंपनीने आश्वासन न पाळल्याने माजी आमदार दीपक आत्राम यांनी आदिवासी विद्यार्थी संघ पदाधिकाऱ्यांसह आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी एटापल्ली येथे कडकडीत बंद पाळून प्रशासन व कंपनी प्रशासनाचा निषेध करण्यात आला. चार दिवस उलटूनही प्रशासन दखल घेत नसल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. थेट मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी दीपक आत्राम यांनी पुढे रेटली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details