महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपत्ती व्यवस्थापन करणारी नगरपरिषदच जलमय; गडचिरोली जिल्ह्यात 31 मंडळांमध्ये अतिवृष्टी - BRIDGE OFF

भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागडचा आलपल्लीशी संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने प्रशासनाने भामरागडमधील 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सॅटेलाईट व वायरलेसच्या माध्यमातून प्रशासनाकडून भामरागडमधील पूर परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

गडचिरोली

By

Published : Jul 30, 2019, 10:04 PM IST

Updated : Jul 30, 2019, 11:21 PM IST

गडचिरोली- चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 31 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. या अतिवृष्टीचा फटका आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या गडचिरोली नगरपरिषदेलाही बसला आहे. नगरपरिषदेचा संपूर्ण परिसर जलमय झाल्याने कार्यालयात जाणारे कर्मचारी-नागरिक गुडघाभर पाण्यातून कसरत करत होते. त्यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन करणारी नगरपरिषदच जलमय; गडचिरोली जिल्ह्यात 31 मंडळांमध्ये अतिवृष्टी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 126.5 मिमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे तीन जण जखमी तर चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय 59. 97 टक्के भरला आहे. मात्र, गड-अहेरी, अहेरी-इंदाराम, झुरी, गोडलवाही-कसनसुर, डुमे नाल्याला पूर आल्याने अल्लापल्ली-भामरागड या मार्गावरील वाहतूक सोमवारपासून बंद तर, आमगाव-विसापूर या मार्गावरील पोहार नाल्याला पूर आल्याने हा मार्ग आज सकाळी सहा वाजल्यापासून बंद झाला होता.

भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागडचा आलपल्लीशी संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने प्रशासनाने भामरागडमधील 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सॅटेलाईट व वायरलेसच्या माध्यमातून प्रशासनाकडून भामरागडमधील पूर परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. या पावसामुळे गडचिरोली शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून आयटीआय चौक परिसरातील कृषी महाविद्यालयाचा परिसर तसेच रिलायन्स पेट्रोल पंप जलमय झाल्याचे दिसून आले. आताही पाऊस सुरूच असल्याने जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Last Updated : Jul 30, 2019, 11:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details