गडचिरोली- मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 42.3 मिमी पावसाची नोंद झाली असून यात सर्वाधिक 83 मिमी पाऊस कुरखेडा तालुक्यात झाला. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले असून दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी तालुक्यातील सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; चार तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला - चामोर्शी
तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. शनिवारी रात्री व सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने नद्या व नाले दुथडी भरुन वाहत आहेत. चामोर्शी तालुक्यातील दिना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने चौडमपल्ली नाल्याला सकाळी पूर आला. यामुळे आष्टी-आलापल्ली मार्ग बंद झाला होता. चार तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.
तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. शनिवारी रात्री व सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने नद्या व नाले दुथडी भरुन वाहत आहेत. चामोर्शी तालुक्यातील दिना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने चौडमपल्ली नाल्याला सकाळी पूर आला. यामुळे आष्टी-आलापल्ली मार्ग बंद झाला होता. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने भामरागडजवळून वाहणारी इंद्रावती नदी दुथडी भरुन वाहत आहे तर, भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे.
भामरागड तालुक्यातील दुरध्वनी सेवा व वीजपुरवठा ठप्प आहे. पेरमिलीजवळच्या नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पेरमिली-भामरागड मार्ग बंद आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय याच तालुक्यातील देवलमरी-व्यंकटापूर तसेच अहेरी-महागाव हा रस्ताही पुरामुळे बंद झाला आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गही बंद झाला आहे. जिल्ह्यात आताही पाऊस सुरू असल्याने महत्वाचे अनेक मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत.