गडचिरोली - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याला महत्व दिले जात आहे. जिल्हा प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारात मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र दिसून आले.
गडचिरोलीच्या आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - social distancing gadchiroli
एक महिन्यानंतर गडचिरोली येथील आठवडी बाजार भरवण्याला परवानगी देण्यात आली. दर रविवारी जिल्हा प्रेक्षागर मैदानावर येथील आठवडी बाजार भरत असून नगरपालिका प्रशासनाने स्टॉल लावून नागरिकांना सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, नागरिकांकडून या आवाहनाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्याची ३ झोनमध्ये विभागणी केली आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना ग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून मोठी खबरदारी बाळगली जात आहे. जिल्ह्याच्या सीमा यापूर्वीच बंद करण्यात आल्या असून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची तपासणी करून लोकसंपर्कपासून दूर ठेवले जात आहे.
अशातच एक महिन्यानंतर गडचिरोली येथील आठवडी बाजार भरवण्याला परवानगी देण्यात आली. दर रविवारी जिल्हा प्रेक्षागर मैदानावर येथील आठवडी बाजार भरत असून नगरपालिका प्रशासनाने स्टॉल लावून नागरिकांना सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, नागरिकांकडून या आवाहनाला मूठमाती देण्यात येत आहे. परिणामी सोशल डिस्टस्टिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र येथे दिसून आले.