महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांच्या या अक्षम्य गुन्ह्याला माफी नाही - हंसराज अहिर - शहीद

अहिर म्हणाले, जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. नक्षलवाद माओवाद विरोधी कारवाईसाठी केंद्रसरकार सर्वच राज्यात पूर्णपणे मदत करत आहे. महाराष्ट्रातही ती केली जात आहे. नक्षलवाद्यांनी केलेली ही कारवाई माफ करण्यासारखी नाही. त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. या संदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंहाशीही चर्चा झाली आहे. हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितली

हंसराज अहिर

By

Published : May 2, 2019, 5:33 PM IST

गडचिरोली - गडचिरोलीत झालेला नक्षली हल्ला अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्यात महाराष्ट्र पोलिसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी नक्षल विरोधी केलेल्या कारवाईवर चिडून हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. मात्र, या नक्षलवादी हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी दिली.

हंसराज अहिर
जाबूंरखेडा येथे मंगळवारी हुतात्मा झालेल्या जवानांना आज गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या परिसरात आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. अहिर म्हणाले, जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. नक्षलवाद,माओवाद विरोधी कारवाईसाठी केंद्रसरकार सर्वच राज्यांना पूर्णपणे मदत करत आहे. महाराष्ट्रातही ती केली जात आहे. नक्षलवाद्यांनी केलेली ही कारवाई माफ करण्यासारखी नाही. त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. या संदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंहाशीही चर्चा झाली आहे. हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितली

ABOUT THE AUTHOR

...view details