गडचिरोली - गेल्यावर्षी २१ आणि २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर-बोरीया जंगलात नक्षलवादी आणि पोलिसात चकमक झाली होती. या चकमकीत 40 नक्षलवादी ठार झाले होते. चकमकीत मारला गेलेला जहाल नक्षलवादी साईनाथ उर्फ डोलेश मादी आत्राम याची समाधी बांधण्यात आली आहे. त्याच्या आईने ही समाधी बांधली आहे.
गडचिरोलीत गेल्यावर्षी ठार झालेल्या नक्षलवाद्याची आईने बांधली समाधी
अहेरी तालुक्यात गट्टेपल्ली येथे आत्राम याची आई तानी मादी आत्राम हिने त्याचे वर्षश्राद्ध केले. यासाठी निमंत्रण पत्रिका छापून तेरवीचा कार्यक्रम देखील करण्यात आला.
अहेरी तालुक्यात गट्टेपल्ली येथे आत्राम याची आई तानी मादी आत्राम हिने त्याचे वर्षश्राद्ध केले. यासाठी निमंत्रण पत्रिका छापून तेरवीचा कार्यक्रम देखील करण्यात आला. नक्षलवादाचे हे उदात्तीकरण असल्याची भावनाही यातून जागृत होऊ शकते. काही स्वयंसेवी संस्थानी गावकऱयांच्या मदतीने अशा समाधी फोडल्या होत्या. अलीकडे नक्षल्यांच्या हिंसक कारवायांमुळे जिल्हा ढवळून निघाला असतानाच आता ही घटना समोर आल्याने नक्षली किती वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत, हे दिसून येत आहे.
दरम्यान, काल एटापल्ली तालुक्यात घोटसूर येथे नक्षलवाद्यांनी २ वाहनांची जाळपोळ केली होती. रस्ता बांधकामाला नक्षल्यांचा किती विरोध सुरू आहे, हे अलीकडच्या घटनांवरून दिसून येते.