महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत गावकऱ्यांनी केली नक्षली बॅनरची होळी; 'नक्षल बंद'ला विरोध - naxal attack

नक्षलवाद्यांनी बंदच्या नावाखाली एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली ते करेम फाट्याच्या दरम्यान झाडे पाडून बॅनर लावून रस्त्यावरील वाहने अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, याला गावकऱ्यांनी स्वतः विरोध दर्शवित नक्षलवाद्यांनी रस्त्यात पाडलेल्या झाडांना बाजूला करून नक्षल्यांनी लावलेल्या बॅनर्सची होळी केली.

गडचिरोली

By

Published : May 19, 2019, 4:04 PM IST

गडचिरोली - नक्षलवाद्यांनी आज (19 मे) रोजी पुकारलेल्या बंदला गडचिरोलीतील अनेक गावकऱ्यांनी विरोध केल्याचे दिसून येत आहे. गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर काढून टाकत बॅनरची होळी केली व घोषणा दिल्या.

नक्षलवाद्यांनी 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९'च्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. मात्र, गडचिरोलीतील दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेने त्यांचे आवाहन मोडीत काढत स्वतःहून घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला आपला पाठींबा असल्याचे दाखवून दिले होते. यामुळेच महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त मतदानाची टक्केवारी ही गडचिरोली जिल्ह्यात नोंदवली गेली होती.

गडचिरोली
या घटनांमुळे नक्षलवाद्यांनी आपले अस्तित्व दाखवण्यासाठी व समाजात भिती निर्माण करण्यासाठी 19 मे रोजी 'गडचिरोली जिल्हा बंद'चे आवाहन केले होते. परंतु, या बंदला देखील गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. नक्षलवाद्यांनी बंदच्या नावाखाली एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली ते करेम फाट्याच्या दरम्यान झाडे पाडून बॅनर लावून रस्त्यावरील वाहने अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, याला गावकऱ्यांनी स्वतः विरोध दर्शवित नक्षलवाद्यांनी रस्त्यात पाडलेल्या झाडांना बाजूला करून नक्षल्यांनी लावलेल्या बॅनर्सची होळी केली. यावेळी घोषणाही दिल्या.
गडचिरोली

ABOUT THE AUTHOR

...view details