गडचिरोली - गर्भवती महिलेला प्रसूतीच्या शस्त्रक्रियेसाठी नेणारी रुग्णवाहिका तेलंगाणा जिल्हा प्रशासनाने सीमेवर अडवली. सिरोंचा तालुक्यात मंडलापूर येथील स्वर्णरेखा तुमनुरी या गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात सुविधा नसल्याने तेलंगाणाच्या मंचेरियाल येथे नेण्याची सूचना केल्यानंतर रुग्णवाहिका निघाली. मात्र, महाराष्ट्र तेलंगाणा सीमेवर तेलंगाणा पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली.
धक्कादायक..! तेलंगणा प्रशासनाने गर्भवती महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवली - telangana corona update
सिरोंचा तालुक्यात मंडलापूर येथील स्वर्णरेखा तुमनुरी या गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात सुविधा नसल्याने तेलंगाणाच्या मंचेरियाल येथे नेण्याची सूचना केल्यानंतर रुग्णवाहिका निघाली. मात्र, महाराष्ट्र तेलंगाणा सीमेवर तेलंगाणा पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली.
मंचेरियालच्या जिल्हा प्रशासनाने अडेल भूमिका घेऊन वाहने येवू न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, गर्भवती महिलेची परिस्थिती पाहून, वाहन सोडणे आवश्यक असताना तेलंगाणा प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे महिलेला घेऊन रुग्णवाहिका ताटकळत उभी राहिली. ही बाब माहित होताच गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संवाद साधून विनंती केली. तरीही तेलंगाणा प्रशासन एकायला तयार नव्हते. अखेर वरिष्ठ अधिकारी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही रुग्णवाहिका सोडली.
वेळेवर उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता असते. अशा वेळेसही वाहन न सोडल्याने तेलंगाणा सरकारच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त होत आहे.