महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्लकोटा नदीला पूर : भामरागडमध्ये शिरले पाणी, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला

पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग काल शनिवार रात्रीपासून बंद झाला आहे. पुराचे पाणी भामरागड शहरातही शिरल्याने येथील बाजारपेठेतील दुकाने पाण्याखाली आली आहेत. तर तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.

पर्लकोटा नदीला पूर : भामरागडमध्ये शिरले पाणी, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला
पर्लकोटा नदीला पूर : भामरागडमध्ये शिरले पाणी, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला

By

Published : Aug 16, 2020, 10:12 AM IST

गडचिरोली- जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग काल शनिवार रात्रीपासून बंद झाला आहे. पुराचे पाणी भामरागड शहरातही शिरल्याने येथील बाजारपेठेतील दुकाने पाण्याखाली आली आहेत. तर तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.

पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी भामरागड तालुक्याचा संपर्क तुटतो. गतवर्षी तब्बल आठ वेळा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. यावर्षी आतापर्यंत जोरदार पाऊस न झाल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने भामरागड लगतची पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नद्या दुथडी भरून वाहत असून काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढले. तर रात्री उशिरा भामरागड गावातही पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत.

पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम कालपासूनच प्रशासनाकडून सुरू आहे. पुरामुळे भामरागड-आलापल्ली मुख्य मार्ग बंद असल्याने भामरागड तालुक्यातील 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details