गडचिरोली - नक्षली कारवायांवर नजर ठेवण्यासाठी गृहमंत्रालय पाचशे कोटींचे ड्रोन कॅमेरे खरेदी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोलीत पत्रकार परिषदेत दिली. गृहमंत्री झाल्यानंतर शुक्रवारी प्रथमच गृहमंत्री देशमुख यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
नक्षली कारवायांवर नजर ठेवण्यासाठी पाचशे कोटींचे ड्रोन - गृहमंत्री हेही वाचा - विरोधात बोलणार्यांना तत्कालीन सरकारने शहरी नक्षलवाद ठरवलं - गृहमंत्री
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल कारवाया सतत घडत असतात. मात्र, नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी पोलीस दलाचे शौर्य पूर्ण काम सुरू आहे. जंगलातील नक्षलवाद्यांवर हालचाल ठेवण्यासाठी गृहमंत्रालय पाचशे कोटींचे ड्रोन कॅमेरे खरेदी करणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रखडलेली भरती प्रक्रिया दूर करण्यासाठी सुधारित बिंदू नामावली अमलात आणली जाईल. राज्यात लवकरच पोलीस भरती घेतली जाणार असून, यात सर्वाधिक जागा गडचिरोली जिल्ह्यासाठी राहणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
पोलीस भरती सोबतच इतरही पद भरतीसाठी राज्य शासनाचे प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी दिलीय. देशमुख यांचे पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन होताच त्यांनी वीर जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर वीरांच्या स्मृती कक्षाची पाहणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करून जिल्ह्याचा आढावा घेतला. या पत्रकार परिषदेला आमदार धर्मरावबाबा आत्राम पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे जिल्हाधिकारी दीपक सिंगला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा -