गडचिरोली -जिल्ह्यातील अतिमागास व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यात एक विस्मयकारक प्रयोग पहायला मिळाला आहे. या ठिकाणी भौतिक स्वरूपातील हवे ते नवे तंत्रज्ञान आजही पोहचलेले नाही. मात्र येथील अशिक्षित आदिवासींनी आपल्या कल्पकतेचा वापर करून मासे पकडण्यासाठी ग्रामीण तंत्रज्ञानातून विना नट बोल्टचे मासेमारी यंत्र विकसित केले आहे.
अशिक्षित आदिवासी बांधवांनी बनवले विना नट बोल्टचे मासेमारी यंत्र... हेही वाचा... अजित पवार दिशाभूल करत आहेत; भाजपसोबत आघाडीचा प्रश्नच नाही, शरद पवारांचा पलटवार
भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल असून येथील शेतकरी काही प्रमाणात धान करतात. जंगलातून वाहणाऱ्या नाल्यात बारमाही पाणी राहत असल्याने अनेक जण मासेमारी करतात. शेतातून वाहणारे नाल्यातील प्रवाहात मासे पकडण्यासाठी येथील आदिवासी बांधवांनी ग्रामीण तंत्रज्ञानाचा वापर करत मासेमारी यंत्र बनवले आहे.
हेही वाचा... अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा
या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबुचा वापर यासाठी त्यांना केला आहे. या बांबुपासून बनवलेली जाळी, नाल्यात अडवुन ठेवली जाते. संध्याकाळपर्यंत यात अलगदरित्या मासे अडकले जातात. या भागातील आदिवासी पावसाळ्यात दररोज मासेमारी करतात. मात्र नाल्यातील पाण्यातील मासे पकडण्यासाठी त्यांना मेहनत करावी लागते.
हेही वाचा... अजितदादांनी साहेबांचा निर्णय मान्य करुन स्वगृही परत यावं - रोहित पवार
हे शेतकरी पावसाळ्यात आणि त्यानंतर नाल्यात पकडलेले मासे, घरची रोजची गरज भागल्यानंतर उरलेले मासे भाजून अथवा सुकवून ठेवतात. उन्हाळ्यात त्यांना जेव्हा भाजीपाल्याची समस्या उद्भवते तेव्हा या वाळवलेल्या माशांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. या आदिवासी बांधवांनी कोणत्याही ज्ञानी वैज्ञानिकाकडून घेतलेल्या ज्ञानातून हा अविष्कार घडवून आणलेला नाही, तर निसर्गतः मिळालेल्या ज्ञानातून त्यांनी हे नट बोल्ट नसलेले मासेमारी यंत्र बनवलेले आहे.
हेही वाचा... शरद पवार आपल्यासोबत ठामपणे, चिंता करण्याचे कारण नाही - उद्धव ठाकरे