गडचिरोली :गडचिरोलीजिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील दामरंच्या जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक ( Encounter between police Naxalites in Gadchiroli ) उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंटस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले ( Two Naxalites killed ) आहे. त्याशिवाय आणखी काही नक्षली मारले गेल्याचा अंदाज पोलीस दलाने व्यक्त केला आहे.
Two Naxalites killed : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार - Two Naxalites killed
गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक ( Encounter between police Naxalites in Gadchiroli ) झाली. यात दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
दोन नक्षलवादी ठार : गडचिरोली आणि छत्तीसगड राज्यातील बिजापूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. अहेरी तालुक्यातील दामरंचा जंगल क्षेत्रातील छत्तीसगड राज्याच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि बिजापूर पोलीस संयुक्त अभियान राबवत होते. दरम्यान नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून मृतांमध्ये एका महिला नक्षलीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरू असून आणखी काही नक्षली मारले गेल्याचा अंदाज पोलीस दलाने व्यक्त केला ( More Naxalites killed estimated ) आहे.
मंडला जिल्ह्याच्या सीमेवर चकमक :गडचिरोलीजिल्ह्याच्या आणि मध्यप्रदेशाला लागून असलेल्या बालाघाट मंडला जिल्ह्याच्या सीमेवर जंगलात 1 डिसेंबरला चकमक झाली होती. हॉक फोर्स सोबत झालेल्या चकमकीत 2 नक्षलीला मारण्यात यश आले होते. यात भोरमदेव कमेटी पीएल-2 चा एसीएम कमांडर राजेश होता, तर दुसरा गणेश मडावी वर्ष 27 हा गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत नैनगुढा गावचा रहिवासी होता.