गडचिरोली / नागपूर - अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आज गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे नागपूरवरून गडचिरोली येथे जाण्यासाठी निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी ज्या भागात नुकसान झालेले आहे तेथील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर; पूर नुकसानीच्या पंचनाम्याचे दिले आदेश
गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. वित्तहानी आणि जीवितहानीही झाली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री पूरस्थिती नियंत्रणासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी नागपूरहून रवाना झाले. त्याने संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी सूचना दिल्या असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
राज्याचा शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पुराच्या पाण्याने थैमान घालते आहे. शेकडो गावांचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे. पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे आज गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेण्यासाठी निघाले आहेत.
अजूनही अनेक नागरिक पुरात अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसलेला असून तेथील पंचनामे तातडीने कारण्याची सूचना सुद्धा देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.