महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे गडचिरोली एसटी आगारला अडीच कोटींचा फटका - गडचिरोली कोरोना संकट

गडचिरोली आगारात 111 बसगाड्या आहेत. या बसगाड्या लांब पल्ल्यासह दुर्गम भागात सोडले जातात. त्यामुळे दर दिवशी जवळपास नऊ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळत असते. मात्र, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने बससेवा पूर्णता बंद ठेवण्यात आली आहे.

gadchiroli st bus loss
लॉकडाऊनमुळे गडचिरोली एसटी आगारला अडीच कोटींचा फटका

By

Published : Apr 7, 2020, 7:13 PM IST

Updated : Apr 7, 2020, 8:30 PM IST

गडचिरोली - 'कोरोना विषाणू'च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. तत्पूर्वी 22 मार्चला एक दिवशीय जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. जनता कर्फ्यूपासून ते आतापर्यंत एसटीची चाके थांबलेली असून, या दिवसांमध्ये एसटी महामंडळाच्या गडचिरोली आगारला तब्बल अडीच कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

लॉकडाऊनमुळे गडचिरोली एसटी आगारला अडीच कोटींचा फटका
गडचिरोली आगारात 111 बसगाड्या आहेत. या बसगाड्या लांब पल्ल्यासह दुर्गम भागात सोडले जातात. त्यामुळे दर दिवशी जवळपास नऊ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळत असते. मात्र, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने बससेवा पूर्णता बंद ठेवण्यात आली आहे. 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असले तरी त्यानंतर बससेवा सुरू होईल की नाही, हे अद्यापही निश्चित नाही. त्यामुळे एसटी महामंडळावर मोठी बिकट परिस्थिती ओढवली आहे. नियमित उत्पन्न मिळत असतानाही कधीकधी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी किंवा डिझेल खरेदीसाठी महामंडळाकडे पैसे नसतात. आता तर बससेवा पूर्णता बंद असल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे. बंद स्थितीमुळे बसची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होऊन खराब होण्याचाही धोका वाढला आहे. तर गाडी जास्त दिवस उभी राहिली तर ऑइल घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर तीन दिवसांनी सर्वच बसगाड्या जवळपास दहा ते पंधरा मिनिटांसाठी सुरू केल्या जात आहेत. यामुळेही अतिरिक्त डिझेल खर्च सहन करावा लागत आहे.
Last Updated : Apr 7, 2020, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details