महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिरोंच्यातील कंटेन्मेंट वार्डातील नागरिकांची दैंनदिन गरजांसाठी दैना, जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची प्रशासनाकडे मागणी - भाजीपाला-अन्नधान्य पुरवठा करण्याची प्रशासनाकडे मागणी

या घटनेची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील व पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांना मिळाली. तात्काळ त्यांनी कंटेन्मेंट एरिया असलेल्या प्रभागास भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात येथील नागरिकांना माहिती व समज दिली. तसेच फळ-भाज्या व किराणा राशन कंटेन्मेंट एरियाच्या गेट जवळ उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली.

demand to administration supply daily needs to citizens of containment zone in gadchiroli
सिरोंच्यातील कंटेन्मेंट वार्डातील नागरिकांची दैंनदिन गरजांसाठी दैना

By

Published : Jun 9, 2020, 8:46 PM IST

गडचिरोली - सिरोंचा तालुक्यातील हृदयरोगाच्या रुग्णाला ३१ मे रोजी हैदराबाद रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या वाहन चालक व मालक यांना क्वारंटाईन करण्यात आले. एवढेच नाही तर ते व्यक्ती राहत असलेला सिरोंचा शहरातील (वॉर्ड क्र 7), 31 मे पासून संपूर्ण सील करण्यात आला. यामुळे नागरिकांना भाजीपाला दैनंदिन किराणा इत्यादी खरेदीसाठी अडचणी निर्माण झाल्याने संतापलेले नागरिक घरा बाहेर पडले. नाकाबंदी केलेल्या ठिकाणी येऊन त्यांना अत्यावश्यक अन्नधान्य किंवा भाजीपाला फळे प्रशासनाने पुरवठा करावा, अशी मागणी करत आपला रोष व्यक्त केला.

या घटनेची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील व पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांना मिळाली. तात्काळ त्यांनी कंटेन्मेंट एरिया असलेल्या प्रभागास भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात येथील नागरिकांना माहिती व समज दिली. तसेच फळ-भाज्या व किराणा राशन कंटेन्मेंट एरियाच्या गेट जवळ उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली.

नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, प्रशासनातर्फे कोरोना विषाणूच प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहे. भाजीपाला किराणा घेताना काळजी घेत सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर करावा. ज्या दुकानदार मास्क वापरत नाही त्यांच्या दुकानतला माल विकत घेऊ नका, असे आवाहन सिरोंचा नगर पंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील व पोलीस निरीक्षक अजय आहीरकर यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details