गडचिरोली- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग म्हणून नेलगुंडा ओळखल्या जातो. येथील साधना विद्यालयाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, साधना विद्यालयाच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे (गोडसे) उपस्थित होत्या.
शाळेचा पहिला दिवस; जिल्हाधिकाऱ्यांचा नक्षलग्रस्त नेलगुंडातील विद्यार्थ्यांशी संवाद - जिल्हाधिकारी
नक्षलग्रस्त भाग म्हणून नेलगुंडा ओळखल्या जातो. येथील साधना विद्यालयाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी भेट दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नेलगुंडा येथील भेटीदरम्यान येथील जिल्हा परिषद शाळेलासुद्धा भेट दिली. गावातील आदिवासी नागरिकांना वीर बाबुराव शेडमाके सुलभ जात प्रमाणपत्र योजनेंतर्गत जात प्रमाणपत्रांचे वाटप केले. आदिवासी नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधला. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. भामरागड येथे २२ जूनला उद्घाटन करण्यात आलेल्या मॉडेल स्कूललासुद्धा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट दिली.
शाळेचा पहिला दिवस असल्याने उपस्थित विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. शिक्षकांशी चर्चा केली. जिल्ह्यातील सर्वात उच्च प्रतीची शाळा म्हणून मॉडेल स्कूलला उदयास आणण्याचे आपले स्वप्न असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशिल रहा, अशा सूचना त्यांनी शिक्षकांना दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार कैलास अंडील, संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाणे, गटशिक्षणाधिकारी निकम, प्रकल्प अधिकारी विजय मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच कैवल्य एज्युकेशन संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.