महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भामरगड नगरपंचायतीच्या दोन प्रभागातील पोटनिवडणुक शांततेत; सोमवारी मतमोजणी

भामरागड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक पाच आणि सोळा मधील सदस्यनिवडीसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. दोन प्रभागामध्ये चार उमेदवार रिंगणात होते. सोमवारी मतमोजणी होणार आहे.

मतदान केंद्राबाहेर महिलांची रागं
मतदान केंद्राबाहेर महिलांची रागं

By

Published : Dec 30, 2019, 5:05 AM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रसत भाग म्हणुन ओळख असलेल्या भामरागड नगरपंचायतीची पोटनिवडणुक रविवारी पार पडली. प्रभाग क्रमांक पाच आणि सोळा मधील सदस्यनिवडीसाठी ही निवडणूक घेण्यात आली. प्रभाग क्र. 5 मध्ये 60.05 टक्के तर प्रभाग क्र.16 मध्ये 83.85 टक्के मतदान झाले आहे. दोन्ही प्रभागामध्ये चार उमेदवार रिंगणात होते. सोमवारी मतमोजणी होणार आहे.

नगरपंचायत प्रभाग क्र. 5 मधील सदस्य शालीनी धानोरकर यांनी जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही. तसेच प्रभाग क्र. 16 मधील हरिभाऊ रापेल्लीवार यांना तीन अपत्यांच्या कारणास्तव त्यांचे नगरसेवक सदस्यत्व रध्द करण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही जागेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. ताडगाव आणि भामरगड या दोन मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रभाग क्र. 5 मध्ये 73 पुरुष, 75 स्त्री असे एकुण 148 मतदारांपैकी 43 पुरुष 46 स्त्री एकुण 89 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर प्रभाग क्र.16 मध्ये 87 पुरुष आणि 74 स्त्री असे एकुण 161 मतदारांपैकी 69 पुरुष आणि 66 स्त्रीयांनी मतदान हक्क बजावला असल्याची माहिती तहसीलदार कैलास अंडिल यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details