गडचिरोली - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना टाळेबंदी सुरू करण्यात आली. टाळेबंदी दरम्यान सर्व व्यापार काही महिन्यांसाठी ठप्प झाले. यामुळे जनतेचे आर्थिक कंबरडे मोडलं असून जनतेचे मागील 4 महिन्यांचे वीजबिल माफ करावे व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर 10 रुपये अनुदान देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात भाजपाच्या वतीने शनिवारी (दि. 1 ऑगस्ट) महाएल्गार आंदोलन करण्यात आले.
भाजपाकडून गडचिरोलीत 'महाएल्गार', महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी - Gadchiroli BJP news
चार महिन्यांचे वीजबिल माफ करावे, दुध उत्पादकांना प्रति लिटर 10 रुपयांचे अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी भाजपच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात महाएल्गार आंदोलन करण्यात आले.
agitetor
गडचिरोली शहरातील गांधी चौकात भाजपचे आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध घोषणा देत मागील 4 महिन्यांची वीजबिल माफ करावे व दूध उत्पादकांना प्रती लिटर 10 रुपये द्यावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या संपूर्ण गण व गटामध्ये हे आंदोलन झाले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.