महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुसळधार पावसाने सातव्यांदा तुटला भामरागडचा संपर्क ; पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करणारा चमू अडकला

गडचिरोली जिल्ह्यात चार सप्टेंबरपासून सतत चार दिवस मुसळधार पाऊस झाला. याच काळात छत्तीसगडमध्येही पाऊस झाल्याने भामरागड गावालगतच्या पर्लकोटा व पामुलगौतम या दोन्ही नद्यांनी भामरागडला वेढा घातला. पुराचे पाणी भामरागड मध्ये शिरल्याने जवळपास 70 टक्के घरे पाण्याखाली होती. सहा ते सात दिवस पाण्याखाली राहिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पूर ओसरला.

मुसळधार पावसाने सातव्यांदा तुटला भामरागडचा संपर्क

By

Published : Sep 12, 2019, 11:43 AM IST

गडचिरोली - मुसळधार पावसामुळे पुन्हा सातव्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. बुधवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढले आहे. सतत सात दिवस भामरागड मधील 70 टक्के घरे पाण्याखाली होती. पूर ओसरताच भामरागडवासीयांना मदतीसाठी विविध सामाजिक संघटनांकडून मदत पोहोचवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी चमू पाठवला. मात्र, भामरागड-आलपल्ली मार्ग पुन्हा बंद झाल्याने हा चमू तेथेच अडकला आहे आणि सर्वेक्षणात अडथळे निर्माण झाले आहेत

मुसळधार पावसाने सातव्यांदा तुटला भामरागडचा संपर्क

हेही वाचा -लोकांचे जीव वाचावण्यासाठी नवा मोटार वाहन कायदा, सरकारी तिजोरी भरण्याचा उद्देश नाही - गडकरी

जिल्ह्यात चार सप्टेंबरपासून सतत चार दिवस मुसळधार पाऊस झाला. याच काळात छत्तीसगडमध्येही पाऊस झाल्याने भामरागड गावालगतच्या पर्लकोटा व पामुलगौतम या दोन्ही नद्यांनी भामरागडला वेढा घातला. पुराचे पाणी भामरागड मध्ये शिरल्याने जवळपास 70 टक्के घरे पाण्याखाली होती. सहा ते सात दिवस पाण्याखाली राहिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पूर ओसरला. सकाळच्या सुमारास भामरागड- आलपल्ली मार्ग सुरू झाला. मात्र, काही तास उलटत नाही तोच मुसळधार पाऊस झाल्याने सातव्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details