गडचिरोली -आपण केलेल्या विकास कामांमुळेच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकत दुसऱ्यांदा लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. अशी प्रतिक्रिया गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून विजयी झालेले महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
आपण केलेल्या विकासकामांमुळे लोकसभेत दुसऱ्यांदा संधी - अशोक नेते - opportunity
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजप उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होईल, असे भाकीत वर्तवण्यात आले होते. मात्र, हे भाकीत सपशेल खोटे ठरले. भाजपचे नेते तब्बल सुमारे ऐंशी हजाराच्या मतांनी विजयी झाले. विजयी झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी यापूर्वीच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. विकास कामांमुळे आपण दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजप उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होईल, असे भाकीत वर्तवण्यात आले होते. मात्र, हे भाकीत सपशेल खोटे ठरले. भाजपचे नेते तब्बल सुमारे ऐंशी हजाराच्या मतांनी विजयी झाले. विजयी झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी यापूर्वीच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. विकास कामांमुळे आपण दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. निवडून देताना गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील जनतेने आपल्यावर विश्वासाला टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला कोणताही तडा न जाऊ देता, या क्षेत्रातील मूलभूत समस्या सोडवण्याचा आपला प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.