गडचिरोली- नक्षलदृष्टया अतीसंवेदनशिल व दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १०२ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामध्ये ०४ अपर पोलीस अधिक्षक, ०३ सहायक पोलीस निरीक्षक, १६ पोलीस उपनिरीक्षक, ७९ पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.
गडचिरोलीतील १०२ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर - गडचिरोली
नक्षलदृष्टया अतीसंवेदनशिल व दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १०२ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र राज्यात उल्लेखनीय व विशेष कामगीरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येतो. यावर्षी नुकत्याच जाहीर झालेल्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण ८०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह घोषित करण्यात आले आहे. यामध्ये तत्कालिन अपर पोलीस अधिक्षक व सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, तत्कालिन अपर पोलीस अधिक्षक व सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस अधिक्षक राजा रामासामी, सध्या कार्यरत अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) गडचिरोली महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक (अभियान) गडचिरोली डॉ. हरी बालाजी यांचा समावेश आहे.
पुरस्कारप्राप्त सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनी पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.