गडचिरोली - गोंडवाना विद्यापीठात पहिल्या टप्प्यात 50 एकर जागेमध्ये आदर्शवत कॅम्पस उभारण्यात येणार आहे. हा कॅम्पस राज्यातील इतर विद्यापीठांसाठी आदर्शवत ठरेल, असे नियोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. गोंडवाना विद्यापीठात आयोजित केलेल्या डाटा सेंटर व मॉडेल कॉलेज भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी दिली. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे गुरुवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते डाटा सेंटरचे उद्घाटन तसेच मॉडेल कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन पार पडले.
गोंडवाना विद्यापीठासाठी 50 एकरचा आदर्शवत कॅम्पस तीन कामे पूर्ण केल्याचा समाधानउदय सामंत यांनी उद्घाटन प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यापीठाला बी-12 चा दर्जा मिळवून देण्याची मागणी केली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून गोंडवाना विद्यापीठाला बी-12 चा दर्जा मिळाला असून नागपूर विद्यापीठात असलेले गडचिरोली येथील मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीला आता हस्तांतरित झालेले आहे. तसेच येथे अद्यावत डाटा सेंटरचे उद्घाटन झाले. या तीन गोष्टी आपण मंत्री झाल्यानंतर पूर्ण केल्याचा मला समाधान आहे. भविष्यात गडचिरोली विद्यापीठ राज्यासाठी मॉडेल ठरावे, असे नियोजन शासनस्तरावर केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
गोंडवाना विद्यापीठासाठी 50 एकरचा आदर्शवत कॅम्पस प्राध्यापक संघटनांच्या 454 तक्रारींचे निवारणविद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून त्या-त्या विद्यापीठांमध्ये कार्यक्रम घेतले जात आहे. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात तक्रार निवारण कार्यक्रमांमध्ये येथील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तब्बल 593 ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. यापैकी 454 तक्रारीचे निवारण करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वन आणि आदिवासी जीवनावर आधारित अभ्यासक्रमावर भरगडचिरोली जिल्हा वनव्याप्त आणि आदिवासीबहुल जिल्हा आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात वन आणि आदिवासींच्या जीवनावर आधारित अभ्यासक्रमावर भर दिला जाईल. भविष्यात आदिवासींच्या हाताला काम मिळावे यासाठी बांबूवर आधारित उद्योग प्रशिक्षण विद्यापीठातून दिले जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -फेरीवाल्यांकडून जमा केली जातेय खंडणी, मनसेचा सेनेवर गंभीर आरोप