गडचिरोली - जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा कहर सुरुच असून, पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन गेल्या २४ तासात नक्षलवाद्यांनी दोघांची हत्या केली आहे. रविवारीच भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी एकाची हत्या केली होती. त्यानंतर आज एटापल्ली तालुक्यातील बांडे गावालगत एकाची हत्या केली आहे. शिशिर सरकार असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नक्षलवाद्यांचा कहर सुरुच.. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन २४ तासात दुसरी हत्या - killed
जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा कहर चालू केला आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी एकाची हत्या केल्याची घटना घडली
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली एकाची हत्या
आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. 7 दिवसातील ही चौथी घटना आहे. महाराष्ट्र दिनाच्या पहाटे कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे 27 वाहनांची केली होती जाळपोळ केली होती. त्यानंतर जांभूळखेडा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवानांना वीरमरण आले होते. काल भामरागड तालुक्यातील एकाची केली होती हत्या
Last Updated : May 6, 2019, 11:10 AM IST