गडचिरोली - तेलंगणामधून रेल्वेने जिल्ह्यातील वेगवगळ्या ६ तालुक्यातील ९५३ प्रवासी तथा मजूर वडसा येथे सुखरूप पोहोचले. दक्षिण रेल्वेमार्फत रायनापडू या तेलंगणातील रेल्वे स्थानकापासून वडसा येथील स्थानकापर्यंत व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी त्यांना आवश्यक अल्पोपहार देऊन एसटी द्वारे पोहोचवण्यात आले.
तेलंगणातून रेल्वेने सुखरूप पोहोचले ९५३ प्रवासी; प्रशासनाकडून आरोग्य तपासणी - गडचिरोली कोरोना अपडेट्स
तेलंगणामधून रेल्वेने आलेल्या प्रवाशांमध्ये गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या सीमालगतच्या जिल्ह्यातील मजुरांचाही समावेश होता. वडसा येथे प्रशासनाकडून रेल्वेने आलेल्या सर्व प्रवाशांना शारीरिक आंतर ठेवून प्रत्येक बसमध्ये नोंदी घेऊन बसविण्यात आले.
तेलंगणामधून रेल्वेने आलेल्या प्रवाशांमध्ये गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या सीमालगतच्या जिल्ह्यातील मजुरांचाही समावेश होता. वडसा येथे प्रशासनाकडून रेल्वेने आलेल्या सर्व प्रवाशांना शारीरिक आंतर ठेवून प्रत्येक बसमध्ये नोंदी घेऊन बसविण्यात आले. वडसा येथील प्रशासनाकडून योग्यप्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कालच जिल्हाधिकारी दीपक सिंगला व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी रेल्वे स्थानक परिसराला भेट देऊन तयारीबाबत आढावा घेतला होता.
एसटी महामंडळाकडून एकूण २८ बस पुरविण्यात आल्या होत्या. महामंडळाचे विभागीय नियंत्रक व व्यवस्थापक अशोक वाडीभस्मे व आगार व्यवस्थापक मंगेश पांडे यावेळी वडसा येथे उपस्थित होते. प्रत्येक गावात प्रवाशांना सोडण्याआधी तालुक्यात प्रत्येक प्रवाशांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. यावेळी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेद्र कुतीरकर, गट विकास अधिकारी श्रावण सलाम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामटेके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कुमरे उपस्थित होते.