गडचिरोली- चीनमधील धोकादायक कोरोना व्हायरसने अमेरिकेसह डझनभर देशांना घेरले आहे. या कोरोना व्हायरसचा फटका चीनमध्ये शिकणाऱ्या 27 भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. यात पुणे, गडचिरोलीसह महाराष्ट्रातील 7 विद्यार्थ्यांचा समावेश असून गडचिरोलीचे निवृत्त तहसीलदार दयाराम भोयर यांची मुलगी सोनूचाही यात समावेश आहे.
हेही वाचा - कोरोना व्हायरसचा धोका वाढला, मुंबईत आणखी एक संशयित रुग्ण आढळला
हे सर्व विद्यार्थी चीनच्या हुआन शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर सीयानीग गावात हुबे युनिवर्सिटी ऑफ सायंस अँड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएस शिकत आहेत. या गावात गेल्या एक आठवड्यापासून कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. त्यामुळे विद्यापीठाने 27 भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यास मनाई केली आहे. त्याना तेथून बाहेर पडता येत नसल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचीही कमतरता जाणवू लागली आहे.
'कोरोना'चा फटका : चीनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि त्याचे पालक बोलताना ... येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सलोमी त्रिभुवन (पुणे), जयदीप देवकाटे (पिंपरी-चिचवड), आशिष गुरमे (लातूर), प्राची भालेराव (यवतमाळ), भाग्यश्री उके (भद्रावती), सोनाली भोयर (गडचिरोली), कोमल जल्देवार (नांदेड) यांचा समावेश आहे. अडकलेल्या सातही जणांनी घरच्यांशी संपर्क साधला आहे. तसेच भारतीय दूतावासाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे.
हेही वाचा - ‘कोरोना’चा चौथा रुग्ण मुंबईत आढळला; पालिकेच्या रुग्णालयात होणार विशेष व्यव्स्था