गडचिरोली - हेमलकसा येथील लोकबिरादरीच्या रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सध्या अनेक ठिकाणी समूह संसर्गाचा धोका वाढत असल्याने आणि रुग्णालयात अनेकांची ये-जा असल्यामुळे खबरदारी म्हणून लोकबिरादरीच्या रुग्णालयातील एकूण 50 जणांचे स्वॅब भामरागड ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने घेतले. यामध्ये डॉक्टरांसह परिचारिका, सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे.
हेमलकसाच्या लोकबिरादरी रुग्णालयातील 50 जणांची कोरोना चाचणी - लोकबिरादरी रुग्णालय कोरोना
रुग्णालयात अनेकांची ये-जा असल्यामुळे खबरदारी म्हणून लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालयातून एकूण 50 जणांचे स्वॅब भामरागड ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने घेतले.
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजीपाला बाजार, हॉटेल इत्यादी ठिकाणच्या दररोज गर्दीशी संपर्कात येणाऱ्या सर्व व्यवसायिकांची टप्प्याटप्प्याने कोरोना तपासणी मोहीम सुरू केली आहे.
भामरागड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भावेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय वाघ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अक्षय पांचाळ, अधि परिचारिक अजय आतलामी या पथकाने आज सकाळी हेमलकसा येथील लोकबिरादरीच्या दवाखान्यातील डॉक्टरांसह पन्नास जणांचे स्वॅब घेतले.