महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! पुराच्या पाण्यात विजेच्या धक्क्याने 25 जनावरांचा मृत्यू

राज्यात पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही अशाच पुराचा फटका मुक्या जनावरांना बसला आहे. नाल्याचे पाणी ओलांडून घरी परतणाऱ्या जनावरांना विजेचा धक्का लागून २५ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

By

Published : Sep 8, 2019, 11:24 AM IST

25 animals dead in gadchiroli

गडचिरोली - राज्यात पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही अशाच पुराचा फटका मुक्या जनावरांना बसला आहे. नाल्याचे पाणी ओलांडून घरी परतणाऱ्या जनावरांना विजेचा धक्का लागून २५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे आज सकाळी ही दुर्घटना उघडकीस आली.

व्यंकटपूरकडे जाणारी वीज देवलमरी नाल्यातून जाते. पुरामुळे विजेच्या तारा पाण्यात बुडाल्या होत्या. या नाल्यामधून परत जात असलेल्या २५ जनावरांना विजेचा धक्का बसला, आणि सर्व जनावरांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा :गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे तीन जण वाहून गेले; दोनशेहून अधिक गावे संपर्काबाहेर

ABOUT THE AUTHOR

...view details