महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत नक्षल्यांचा भ्याड हल्ला; १६ जवानांना वीरमरण

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

नक्षल्यांनी भ्या़ड हल्ला केलेले ठिकाण

By

Published : May 1, 2019, 4:23 PM IST

Updated : May 1, 2019, 5:21 PM IST

गडचिरोली- नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालबोट लागले आहे. आज नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात १६ जवानांना वीरमरण आले आहे.

VIDEO - गडचिरोलीत नक्षल्यांचा भ्याड हल्ला; १६ जवानांना वीरमरण

मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली.

नक्षल्यांनी भ्या़ड हल्ला केलेले ठिकाण

त्यानंतर आज (बुधवार) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सी-६० पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून जवळच्या अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला.

भ्याड हल्ल्यात १६ जवानांना वीरमरण

यात १६ जवानांना वीरमरण आले आहे.

पोलिसांचे वाहने जात असताना नक्षल्यांनी केला हल्ला

त्यानंतर पोलिसांकडून परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला

या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे.

नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवलेले ठिकाण

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

नक्षल्यांनी भ्या़ड हल्ला केलेले ठिकाण
Last Updated : May 1, 2019, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details