गडचिरोली - पोलीस दलात उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक कार्यालयाकडून गडचिरोली जिल्ह्यातील ११६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आज (गुरुवारी) पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र दिनी (1 मे) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पदक बहाल करण्यात येणार आहे. महासंचालक पदकामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने सर्वाधिक पदक प्राप्त झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील ११६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक - gadchiroli police news
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून गडचिरोली जिल्ह्यातील ११६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आज (गुरुवारी) पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र दिनी (1 मे) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पदक बहाल करण्यात येणार आहे.
गडचिरोली पोलीस दलाने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पाडलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणका, वर्षभरात नर्मदासारख्या २२ जहाल नक्षलवाद्यांना केलेली अटक, एके-४७ सह आत्मसमर्पण करणाऱ्या जहाल नक्षली विलास कोल्हासह वर्षभरात ३५ नक्षलवाद्यांनी केलेले आत्मसमर्पण, वर्षभरात ९ नक्षलवाद्यांचा खात्मा आणि नक्षलविरोधी लढ्यात केलेल्या इतर उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीमुळे पदक जाहीर करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांना पदक
पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अजयकुमार बन्सल, यांच्यासहीत ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ०३ सहायक पोलीस निरीक्षक, २१ पोलीस उपनिरीक्षक, ०७ सहाएक फौजदार आणि ७८ कर्मचारी यांचा समावेश आहे.