धुळे -युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदित्य युवा संवाद हा कार्यक्रम धुळे शहरातील जयहिंद महाविद्यालयात पार पडला. जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने धुळे शहरात आलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आदित्य संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी आदित्य ठाकरे आश्चर्यचकित; विद्यार्थ्यांचे केले समाधान - धुळे
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदित्य युवा संवाद हा कार्यक्रम धुळे शहरातील जयहिंद महाविद्यालयात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी समर्पक उत्तरे देऊन समाधान केले.
शहरातील जयहिंद महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे यांना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांचे मंचावर आगमन होताच त्यांनी विद्यार्थ्यांना खुशाली विचारली. यावेळी विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. आदित्य युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांना सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील समस्यांबाबत प्रश्न विचारले. आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.