धुळे- मतदानाच्या दिवशी जनतेने दिलेले उस्फुर्त मतदान हीच आपल्या विजयाची पावती आहे. २३ तारखेला जनता मोदींना पंतप्रधान करेल, असा विश्वास डॉ. सुभाष भामरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
धुळे लोकसभा मतदार संघातून मतदार आपल्यालाच विजयी करणार - डॉ. सुभाष भामरे - Dhananjay Dixit
लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर धुळे मतदान संघाचे भाजप उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधी घेतलेली मुलाखत.
धुळे लोकसभा मतदार संघातून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. धुळे लोकसभा मतदार संघात डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यात लढत पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी डॉ. सुभाष भामरे यांच्याशी संवाद साधला असता या निवडणुकीत आपणच विजयी होणार असून जनतेने मोदींना पंतप्रधान बनवण्याचे ठरवले आहे. मतदानाच्या दिवशी जनतेने केलेले मतदान ही आपल्या विजयाची पावती आहे. विजयी झाल्यानंतर आपण प्रलंबित विकासकामे मार्गी लावू, असे आश्वासन डॉ. सुभाष भामरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिले.