धुळे - लोकसभा निवडणुकीचा आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे. धुळे मतदार संघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, मतदान केंद्रांवर कर्मचारी हजर झाले आहेत.
LIVE UPDATES -
- सायंकाळी ६ वाजेपर्यंत५७.२९ टक्के मतदान
- सायंकाळी ५ वाजेपर्यंत५०.९७ टक्के मतदान
- दुपारी ३ वाजेपर्यंत४०.४३ टक्के मतदान
- दुपारी ३ वाजता- दुपारी २ वाजेपर्यंत धुळे मतदारसंघात ३०.४३ टक्के मतदान झाले.
- दुपारी १ः५३ -धुळ्यात १ वाजेपर्यंत २९.७५ टक्के मतदान झाले
- सकाळी ११ः५१ - अपक्ष उमेदवार आणि भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय होते.
- सकाळी ११ः ४६ वाजता - आतापर्यंत १८.२६ टक्के मतदान
- सकाळी ९ः५१ वाजता- काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केले.
- सकाळी ९ वाजता -पहिल्या दोन तासात ६.३१ टक्के मतदान झाले
- सकाळी ९ वाजता- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा आणि सून होत्या. मतदान करुन सगळ्यांनी लोकशाहीचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन भामरेंनी केले.
- सकाळी ७ वाजता - मतदानाला सुरुवात झाली