धुळे -लोकसभा मतदार संघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा २ लाख ६१ हजार १३९ हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे यंदा होणाऱ्या निवडणुकीत एकूण १९ लाख ४हजार ८५९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघ : मतदारांची संख्या वाढली, १ हजार ९४० मतदान केंद्रांवर बजावणार हक्क - voters
धुळे लोकसभा मतदार संघात धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या विधानसभा मतदार संघातील एकूण १९ लाख ४ हजार ८५९मतदार आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत.
धुळे लोकसभा मतदार संघात धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या विधानसभा मतदार संघातील एकूण १९ लाख ४ हजार ८५९मतदार आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा तब्बल २ लाख ६१ हजार १३९ नवमतदारांची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी धुळे लोकसभा मतदार संघात एकूण १ हजार ७०० ६८ मतदान केंद्र आणि १७२ सहाय्यकारी मतदान केंद्र, असे एकूण १ हजार ९४० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यात सर्वाधिक धुळे ग्रामीण मध्ये ३७३ मतदान केंद्र असणार आहेत. तर, सर्वाधिक कमी अर्थात २८४ मतदान केंद्र बागलाण मध्ये असणार आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात ८८ मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. त्यापैकी ५७ संवेदनशील मतदान केंद्र ही मालेगाव मध्य येथे आहेत. तर, सर्वात कमी म्हणजे ३ संवेदनशील मतदान केंद्र धुळे ग्रामिण मध्ये आहेत.