महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे गावाच्या परिसरासह गावात अवकाळी पावसासोबत अचानक वादळासह गारपीठ झाली.

SAKRI RAIN
साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी

By

Published : Mar 27, 2020, 11:12 AM IST

धुळे- जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, एकीकडे कोरोना आजाराचे संकट आलेले असताना दुसरीकडे या पावसामुळे साक्री तालुक्यातील अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत.

साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे गावाच्या परिसरासह गावात अवकाळी पावसासोबत अचानक वादळासह गारपीठ झाली. यामुळे गावातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गावाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वादळाने गावातील घरांचे पत्राचे शेड, कौलारू घरे, झाडे, विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत.

साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी

या वादळात गावातील घरांचे नुकसान झालेले सर्वसामान्य नागरिक शामलाल साहेबराव सुर्यवंशी, निशा प्रभाकर गायकवाड, तुळशिराम काशीराम पवार, महारु झिंगा पवार, वारु काळु वाघ, देविदास पंडीत सुर्यवंशी, रामू मंगा पवार, काशिनाथ गणपत पवार, अशोक हरी गायकवाड, मिरूलाल दयाराम पवार, पंडित दयाराम पवार, शिल्पू सखाराम ठाकरे, संजय भजन पवार, उत्तम पवळू पवार, यांच्यासह गावातील अनेक घरांचे कमीअधिक प्रमाणात नुकसान होऊन कुटुंब उघड्यावर आले आहेत. एकीकडे देशात कोरोनाचे संकट असतांना हे दुहेरी संकट गावातील या कुटुंबांवर आले आहे.

साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details