महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ॲक्सिस बँकेची सिस्टीम हॅक तब्बल 2 कोटी 6 लाख रुपये लांबवले, धुळ्यातील घटना - धुळ्यात बँकेत चोरी

धुळ्यात ॲक्सिस बँकेतून 2 कोटी 6 लाख 50 हजारांची रक्कम अज्ञातांनी सिस्टीम हॅक करून लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

dhule
अज्ञातांनी बँकेची सिस्टीम हॅक करून लांबवले 2 कोटी 6 लाख

By

Published : Jun 10, 2020, 4:37 PM IST

Updated : Jun 10, 2020, 10:31 PM IST

धुळे - विकास बँकेने ॲक्सिस बँकेत सुमारे 2 कोटी 6 लाख 50 हजारांची रक्कम ठेवले होती. ही रक्कम अज्ञातांनी बँकेची सिस्टीम हॅक करून लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिस्टिम हॅक करून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम लांबवल्याची धुळे शहरातील ही पहिलीच घटना आहे.

अॅड. चैतन्य भंडारी, सायबर क्राईम एक्सपर्ट
धुळे विकास सहकारी बँकेने शहरातील ॲक्सिस बँकेत आरटीजीएस आणि ऑनलाइन पोर्टल सेवा दिली आहे. त्यासाठी विशिष्ट खाते क्रमांक तसेच याबाबत 2 जणांना अधिकार देण्यात आले आहेत. ॲक्सिस बँकेतील ही सिस्टीम हॅक करून अज्ञात चोरट्यांनी बँकेतून धुळे विकास बँकेचे ऑनलाइन पद्धतीने तब्बल 2 कोटी 6 लाख 50 हजार रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी विविध अकाउंटचा आधार घेण्यात आला असून, विशेष म्हणजे याबाबत बँकेच्या अधिकृत कोणत्याही व्यक्तीला माहिती मिळालेली नाही. अवघ्या 3 तासात हा प्रकार घडला असून, याबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेत चौकशी केली जाणार असून, ही रक्कम 27 ठिकाणी वर्ग झाली असल्याचं समोर आलं आहे.
Last Updated : Jun 10, 2020, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details