धुळे - तालुक्यातील सोनगीर दोंडाई रस्त्यावर असलेल्या क्रांती स्मारकाजवळ दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून या अपघातामुळे सोनगीर दोंडाईचा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमी चालकाला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन ट्रकचा समोरासमोर अपघात; चालक गंभीर जखमी - रूग्णालय
धुळ्यातील सोनगीर दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या क्रांती स्मारकाजवळ मालवाहू ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे. यामध्ये एक ट्रक चालक गंभीर जखमी आहे.
धुळे तालुक्यातील सोनगीर दोंडाईचा रस्त्यावर सोनगीरकडून दोंडाईच्या दिशेनेकडे जाणारी ट्रक (एम एच १८ ए ए ५१७) आणि दोंडाईकडून सोनगीरकडे जाणारा ट्रक (ए पी २९ यु ५३७९) यांची चिमठाणे पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या क्रांती स्मारकाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक चालक पंकज बोरसे (वय ३० वर्षे, रा. कामपूर ता. शिंदखेडा ) याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. चालक पंकज बोरसे हे कॅबिनमध्ये अडकल्याने त्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.