धुळे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
आचारसंहितेपूर्वी धुळ्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - बदली
आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
दिलीप विठोबा गांगुर्डे (देवपूर पोलीस स्टेशन ते धुळे तालुका पोलीस स्टेशन), शिवाजी मुरलीधर बुधवंत (आझादनगर पोलीस स्टेशन ते शिरपुर पोलीस स्टेशन), संजय दत्तात्रय सानप (शिरपुर पोलीस स्टेशन ते देवपुर पोलीस स्टेशन), दिनेश विठ्ठलराव आहेर (नियंत्रण कक्ष ते आझादनगर पोलीस स्टेशन), दुर्गेश मोहनलाल तिवारी (नियंत्रण कक्ष (नव्याने हजर) ते शिंदखेडा पोलीस स्टेशन), राजकुमार मारुती उपासे (नियंत्रण कक्ष ते वाचक पोलीस अधीक्षक धुळे), भरत दत्तात्रय जाधव (शिंदखेडा पोलीस स्टेशन ते ट्रायल मॉनिटर सेल) सहायक पोलीस निरीक्षक दिलीप नामदेव खेडकर (निजामपुर पोलीस स्टेशन ते सोनगीरी पोलीस स्टेशन), सचिन काशिनाथ शिरसाठ (आझादनगर पोलीस स्टेशन ते निजामपुर पोलीस स्टेशन) अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.