महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 27, 2022, 2:11 PM IST

ETV Bharat / state

Three Incidents Of Fire : 'या' ठिकाणी फटाक्यांमुळे एकाच दिवशी आगीच्या तीन घटना

बुधवार हा धुळ्यासाठी 'अग्नी' वार (Three Incidents Of Fire in Dhule) ठरला. या एकाच दिवशी धुळे शहराच्या विविध भागात आगीमुळे तीन घटना (fire due to crackers) घडल्या. सुदैवानं यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Three Incidents Of Fire
फटाक्यांमुळे एकाच दिवशी आगीच्या तीन घटना

धुळे : बुधवार हा धुळ्यासाठी 'अग्नी' वार (Three Incidents Of Fire in Dhule) ठरला. या एकाच दिवशी धुळे शहराच्या विविध भागात आगीमुळे तीन घटना (fire due to crackers) घडल्या. सुदैवानं यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या घटनांची गुरुवारी सकाळपर्यंत पोलीसांत नोंद नव्हती.



या ठिकाणी आगीचं रौद्र रूप : धुळे महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील पारोळा रोडवरील प्रकाश टॉकीजजवळ असलेल्या गांधीनगर भागातील एका प्लॅस्टिक पाण्याच्या टाकी विक्रेत्याच्या दुकान कम गोदाम असलेल्या ठिकाणी बुधवारी रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास आग लागली. या ठिकाणी कोळसा , लाकडं आणि प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने काही क्षणात आगीनं रौद्र रूप घेतले. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अवघ्या अर्ध्या तासात सहा अग्निशमनच्या बंबाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेड ला यश आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी धुळे महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागातील सहाय्यक अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन, अमोल सोनवणे, संतोष शिरसाठ, जितू सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सहाय्यक अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन यांनी (Three incidents of fire in same day) दिली.

फटाक्यांमुळे एकाच दिवशी आगीच्या तीन घटना


अन्य ठिकाणीही आगीच्या घटना :याच दिवशी धुळे शहराची मुख्य बाजार पेठ म्हणून ओळख असलेल्या, नेहमी गजबजलेला परिसर म्हणून ओळख असलेल्या फुलवाला चौकात देखील एका जुन्या घराला आग लागली. परिसरातील नागरिकांनी तत्परतेनं प्रथम मिळेल, तेथून पाणी घेत पाण्याचा मारा केला तसेच घटनास्थळी अग्निशमनचा एक बंब तात्काळ दाखल झाल्याने आगीवर देखील तात्काळ नियंत्रण मिळवण्यात नागरिकांना, अग्निशमन विभागाला यश आले. या घटनेत देखील कोणीही जखमी झालं नसल्याचं सांगण्यात आले. याच भागात अन्य एका ठिकाणी देखील आगीची घटना घडली. मात्र याठिकाणी देखील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग तात्काळ आटोक्यात आली. अन्य एका घटनेत धुळे शहरातील जयहिंद कॉलनी परिसरात असलेल्या एका बिल्डींग परिसरात आगीची किरकोळ घटना (incidents of fire in same day due to crackers )घडली.

फटाक्यांमुळेच आग :एकाच दिवशी धुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात आगीच्या घडलेल्या घटना या फटाक्यांमुळेच झाल्याचे स्थानिक नागरिक तसेच अग्निशमन विभागाने सांगितले . दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंत या घटनांची पोलीसांत नोंद (incidents of fire due to crackers in Dhule) नव्हती.

ABOUT THE AUTHOR

...view details