धुळे- अमळनेर (जि. जळगाव) येथून इंदौरकडे जाणाऱ्या बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही घटना काल (बुधवारी) सायंकाळी घडली.
मद्यपी चालकाने बस घातली खड्ड्यात; सुदैवाने जीवित हानी नाही - Dhananjay Dixit
अमळनेर (जि. जळगाव) येथून इंदौरकडे जाणाऱ्या बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही घटना काल (बुधवारी) सायंकाळी घडली.
अमळनेरहुन इंदौरकडे जाणारी ( एम एच 20 बी एल 2404) क्रमांकाच्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरली. ही घटना बेटावद गावाजवळ घडली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने ही घटना घडल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. बसचालक मद्य प्राशन करून बस चालवत असतील तर होणाऱ्या अपघातांना बसचालक जबाबदार असतात. या बस चालकांवर परिवहन महामंडळाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.