धुळे - शिंदखेडा तालुक्यातील साहुर गावात अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या रिक्षामुळे पाचवीत शिकणाऱ्या शाळकरी विद्यार्थाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी तत्काळ बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शिंदखेडा तालुक्यात रिक्षातून खाली पडून विद्यार्थाचा मृत्यू; अवैध वाहतुकीचा बळी - विद्यार्थाचा मृत्यू
साहूर गावातील शाळेत जाण्यासाठी बससेवा नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थांना रिक्षेचा सहारा घ्यावा लागतो. अवैधरित्या वाहतूक करणाऱया रिक्षेमुळे पाचवीत शिकणाऱया शाळकरी विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे.
दर्शन कोळी असे मृत विद्यार्थाचे नाव आहे. तो इयत्ता नववीत शिकत होता. साहूर गावातील शाळेत जाण्यासाठी बससेवा नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थांना रिक्षाचा सहारा घ्यावा लागतो. बससेवा नसल्याने या परिसरात अवैध वाहतुकीला उधाण आले आहे. नेहमीप्रमाणे दर्शन हा गुरुवारी शाळेला जाण्यासाठी रिक्षामध्ये बसला. परंतु, रिक्षामधून पडून या विद्यार्थाचा जागीच मृत्यू झाला.
साहूर गावातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शानाभाऊ सोनवणे यांनी केली होती. मागील काही महिन्यांपूर्वी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थांना आणून या मागणीसाठी आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र, अद्यापही या गावात बससेवा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ बससेवा सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.