धुळे - देवपूर भागातील बियरबार मालकाकडून तेरा हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा शिपाई अमोल सुधाकर धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
शहरातील देवपूर परिसरातील हॉटेल कृष्णा परमिट रूम आणि बियर बारचे नूतनीकरण करण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून आठ हजार रुपये व परमिट रूमवर कोणतीही कारवाई न होऊ देण्यासाठी 2 हजार 500 रुपये प्रमाणे मागील दोन महिन्यांच्या हप्त्याचे 5 हजार रुपये असे एकूण 13 हजार रुपयांची लाच घेण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी अमोल सुधाकर धनगर (वय 35 वर्षे) याने तक्रारदाराकडे संबंधित रक्कमेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्यास विरोध करण्यासाठी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिपायाला रंगेहात अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
देवपूर भागातील बियरबार मालकाकडून तेरा हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा शिपाई अमोल सुधाकर धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिपायाला 'रंगेहाथ' अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
या तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अमोल धनगर याला 13 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे संदीप सरग भूषण खलानेकर, प्रशांत चौधरी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने केली