धुळे- बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या दिनेश गायकवाड याच्याकडून पोलिसांनी रसायनसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख रुपये किमतीचे वाहन आणि ४२ हजार रुपये किमतीचे स्पिरिट जप्त केले आहे. शहरातील बारापत्थर भागात ही कारवाई करण्यात आली.
धुळ्यात बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरिटचा साठा जप्त - स्पिरिट
पोलिसांनी बारापत्थर भागात सापळा रचून या चौकातून येणाऱ्या वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनचालक सुनील महारु पाटील याने वाहनात २ ड्रम असल्याची माहिती दिली.
धुळे शहराजवळील बारापत्थर मार्गे शहरात छोट्या मालवाहू ट्रकमधून बनावट मद्यनिर्मितीचे रसायन आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी बारापत्थर भागात सापळा रचून या चौकातून येणाऱ्या वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनचालक सुनील महारु पाटील याने वाहनात २ ड्रम असल्याची माहिती दिली. तसेच ते शिरुडवरून दिनेश गायकवाड याच्या घरातून आणल्याचे त्याने सांगितले. याठिकाणी पोलिसांनी पाहणी केल्यावर बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणारा स्पिरीटचा साठा त्यात आढळून आला. याबाबत वाहनचालकाला विचारणा केल्यावर त्याने दिनेश गायकवाड, धनराज शिरसाठ, सोनू पवार यांची नावे सांगितली.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख रुपये किमतीचे वाहन आणि ४२ हजार रुपये किंमतीचे स्पिरिट असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपी दिनेश गायकवाड याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, यानंतर देखील तो बनावट मद्यनिर्मितीच्या धंद्यात पडला आहे.