धुळे - राजस्थानकडे जाणारा ८० लाख रुपयांचा गुटखा शिरपूर पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. या कारवाईत ८० लाख रुपयांच्या गुटख्यासह कंटेनर, असा १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हे ही वाचा -नाशिकमध्ये 3 सराईत गुन्हेगार जेरबंद, 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरून कोल्हापूरवरून राजस्थानकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये विमल व सुगंधी तंबाखू असल्याची गोपनीय माहिती शिरपूर शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी शिरपूर फाट्याजवळ आपल्या कर्मचार्यांसह शिरपूर फाटा येथे संशयास्पद गाडी थांबवली. या गाडीत काय आहे असे विचारले असता गाडी चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गाडीची तपासणी केली असता त्याच्यात सुगंधी तंबाखू, विमल गुटखा इत्यादी माल आढळून आला. या मालाची किंमत साधारण 80 लाख असून कंटेनर सह 1 कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा -बुलडाणामध्ये बनावट एटीएमद्वारे लुबाडणारी टोळी गजाआड