धुळे - शहरातील अमरनगर भागात वास्तव्यास असलेल्या विशाल माणिक गरूड नामक व्यक्तीच्या खून प्रकरणात शहरातील मोगलाई परिसरातील शाकीर खान शकील खान पठाण (वय 25) या युवकाला अटक केली आहे. अवघ्या दोन दिवसात शहर पोलिसांनी या खूनाच्या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे.
धुळ्यात किरकोळ वादातून हत्या.. दोन दिवसात प्रकरणाचा छडा, आरोपीस अटक - shakir khan arrest
धुळे शहरातील अमरनगर भागात वास्तव्यास असलेल्या विशाल माणिक गरूड नामक व्यक्तीच्या खून प्रकरणात शहरातील मोगलाई परिसरातील शाकीर खान शकील खान पठाण (वय 25) या युवकाला अटक केली आहे.
विशाल माणिक गरूड (वय 43 रा. आंबेडकर चौक, अमरनगर, धुळे) याचा अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली होती. शहरातील गल्ली क्रमांक दोनच्या बोळीत चेहऱ्यावर आणि पोटावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.
2 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास विशाल गरुड याचा धारदार हत्यारांनी वार करत खून केला होता. विशालने जखमी अवस्थेत दुचाकीवरून आपले घर गाठण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अपयशी ठरला. काँग्रेस भवनसमोर तो जखमी अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यरात्रीला सव्वाबारा ते एकच्या सुमारास त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. अशाही अवस्थेत त्यांनी दुचाकीवर घर गाठण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. नवीन महापालिकेकडून तहसील कार्यालयाकडे जाताना टॉवर बगीचा समोर विशाल हा दुचाकीवरून खाली पडले. तिथून पुन्हा उठून परत दुचाकीवर बसून निघाला असता काँग्रेसभवन समोर दुचाकी थांबवून खाली बसले. तेव्हा परिसरातील नागरिकांनी पाहिले असता त्यांच्या तोंडातून रक्त निघत असल्याचे दिसले. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.