धुळे - शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. परिणामी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील मुख्य मार्गावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
धुळ्यातील धरणांची पाणी पातळी वाढली; शाळा-महाविद्यालयांना सोमवारची सुट्टी जाहीर - मध्यम प्रकल्प
धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी रात्रभर आणि रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे साक्री तालुक्यातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी रात्रभर आणि रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे साक्री तालुक्यातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शिवाय पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्प आणि जामखोली धरणामधील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रविवारी तब्बल १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदीत करण्यात आला. मुख्य महामार्गावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळा-महाविद्यालयांना सोमवारची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डी. गंगानाथ यांनी त्यासंबंधीतचे आदेश दिले आहेत.