धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मंजूर झालेली विकास कामे ही ग्रामपंचायतींना देण्यात यावे, यामागणीसाठी सरपंचाच्या वतीने धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी गंगाथरन यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.
विकास कामाचा ठेका ग्रामपंचायतींना द्यावे; सरपंचानी केली मागणी
धुळे जिल्ह्यातील मंजूर झालेली विकास कामे ग्रामपंचायतींना देण्यात यावे, अशी मागणी सरपंचानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात जवळपास ४ कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत. मात्र ही विकास कामे करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून ई-टेंडर काढण्याचा घाट घातला आहे. या माध्यमातून टक्केवारी मिळविण्यासाठी सत्ताधारी पक्ष ई-टेंडर काढत आहे, असा आरोप शिरपूर तालुक्यातील सरपंचांनी केला आहे. मात्र कायद्याने हे काम ग्रामपंचायतीना देणे बंधनकारक असतानादेखील सत्ताधारी पक्ष राजकीय द्वेषापोटी हे करत असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे.
यापार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील सरपंचांनी आज धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी गंगाथरन यांना घेराव घालून निवेदन दिले. विकास कामे ग्रामपंचायतींना न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंचांनी दिला आहे.